औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर सध्या गुन्हेगारांची राजधानी बनत चालले आहे. जालना रोडवर छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने रिक्षेतून उडी घेतल्याची घटना ताजी असताना गुरुवारी पुन्हा एकदा तरुणीने सील्लेखाना परिसरात रिक्षातून उडी घेतली. मात्र या घटनेनंतर भेदरलेल्या रिक्षाचालकाने थेट पोलीस ठाणे गाठत घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.सय्यद सिकंदर सय्यद खालिद वय-40 (रा.हिनानगर, रशीदपुरा) हे रिक्षा चालक असून ते (एम.एच.20 डी सी 0417) ही भाड्याची रिक्षा चालवतात यावरच त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असतो.
याविषयी अधिक माहिती अशी कि, काही दिवसांपूर्वीच जलनारोडवर रिक्षा चालकाच्या छेडछाडी मुळे एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली होती. या मध्ये ती तरुणी जखमी झाली. जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या रिक्षाचालकाला अटक केली. ही घटना ताजी असताना सय्यद यांच्या रिक्षात गुरुवारी संध्याकाळी एक तरुणी क्रांति चौक जवळील मशिदी पासून औरंगपुरा कडे जाण्यासाठी बसली सय्यद हे रिक्षा चालवत असताना शिल्लेखाना जवळील छोट्या गल्ली जवळ येताच तरुणी खाली पडली व ती पायी जात होती. रिक्षातून तरुणीने का उडी घेतली आणि तू कोठे जात आहे. हे सय्यद यांना कळायला मार्ग न्हवते. दरम्यान त्यांनी रिक्षा थांबवत त्या तरुणीला विचारले तुम्ही उडी का घेतली कुठे जात आहात, त्यावर तरुणी घरी जात असल्याचे म्हणाली व काहीही न बोलता पुढे निघून गेली. हा सर्व प्रकार पाहून सय्यद चांगलेच घाबरले. मात्र आपली काहीही चूक नसल्याने त्यांनी थेट क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले.तेथे त्यांनी उपस्थित पोलिसाना घडलेली सर्व घटनेची हकीकत सांगितली.त्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी पोहोचून पाहनी केली.रिक्षा चालकांचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक घेतले.व नोंद करून सोडले.
रिक्षाचालक स्वतः ठण्यात आला –
रिक्षाचालक सय्यद सिकंदर हा स्वतः पोलीस ठाण्यात आला होता. एका तरुणीने त्याच्या रीक्षातून उडी घेतल्याचे सांगितले मात्र अद्याप कोणाचीही तक्रार नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल नाही. – डॉ.गणपत दराडे, पोलीस निरीक्षक क्रांतिचौक
माझी काहीच चूक नाही-
मी संध्याकाळ च्या सुमारास तरुणी प्रवासीला घेऊन जात असताना अचानक तिने शिल्लेखाना भागात उडी घेतली. मी तिची विचारपूस केली मात्र ती घरी जात असल्याचे सांगितले. तिने का उडी घेतली माहीत नाही. हा प्रकार घडल्यानंतर मी घाबरलो आणि ठण्यात जाऊन सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. – सय्यद सिकंदर, रिक्षा चालक