Tuesday, June 6, 2023

शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचे खांदेपालट

औरंगाबाद | सध्या पोलीस दलात बदल्यांचे सत्र सतत सुरू आहे. मागील महिन्यात शहरपोलीस दलात बदल्या करण्यात आल्या होत्या. 560 कर्मचाऱ्यांना नवीन पोलीसठाणे मिळाले होते. आता या कर्मचाऱ्याच्या बदल्यांनंतर पोलीस उपनिरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले. पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार या बदल्या करण्यात येणार आहे. यामध्ये सायबर पोलिस दलाचा पदभार गौतम भातारे यांना देण्यात आला आहे.

सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या

गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे अमोल सातोदरकर यांची सायबर, उपआयुक्त यांचे वाचक वामन बाबुराव बेंद्रे यांची आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी, जवाहरनगर येथील श्रद्धा वायदंडे यांची सिडको, सिडकोचे शेषराव खटाणे यांची पुंडलिक नगर, क्रांती चौक येथील शांतीलाल राठोड यांची वाहतुक शाखा, राहुल सूर्यतळ यांची क्रांती चौक या ठिकाणहुन उस्मानपुरा, घनश्याम सोनवणे यांची पुंडलिक नगर या ठिकाणहुन विशेष शाखा, वनिता चौधरी यांची मुकुंदवाडीतून जवाहरनगर, नितीन कामे यांची हर्सूल येथून क्रांतीचौक, पंकज बारवाल यांची उस्मानपुरा या ठिकाणहून वाहतूक शाखेत, रामेश्वर चव्हाण यांची वाचक कक्षातून एएचटीयू कक्षात, अमोल ढोले यांची एएचटीयू मधून पोलीस आयुक्तांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे.

उपनिरीक्षकांच्या बदल्या

सिडकोच्या उपनिरीक्षक प्रतिभा आबुज यांची बदली एम सिडको याठिकाणी करण्यात आली असून राहुल बांगर यांची बंधने मुकुंदवाडीतुन क्रांती चौकात, अशोक शिके यांची वाहतूक शाखेतून क्रांती चौक, अनंत तावडे सिटी चौक येथून जिन्सी स्टेशन,महादेव गायकवाड क्रांती चौक येथून वेदांत नगर, कैलास अण्णलदास यांची एम सिडको येथून सिडको, विकास खटके यांची पुंडलिक नगर येथून क्रांती चौक, संदीप शिंदे यांची क्रांती चौक येथून एम वाळूज, प्रभाकर सोनवणे यांची पुंडलिक नगर येथून क्रांतीचौक, कृष्णा घायाळ यांची मुकुंदवाडी येथून सिडको, सर्जेराव सानप यांची उस्मानपुरा येथून सातारा, संतोष राऊत यांची क्रांती चौक येथून जवाहर नगर, गजानन सोनटक्के यांची क्रांती चौक येथून गुन्हे शाखा, शंकर डुकरे यांची वेदांतनगर येथून वाहतूक शाखा, उद्धव हाके वा.शा. सिडको येथून सिटी चौक, छोटुराम ठुबे यांची एटीसी यांची क्रांतीचौक, बाळासाहेब आहेर यांची सिडको येथून मुकुंदवाडी, अमोल म्हस्के यांची मुकुंदवाडी येथून गुन्हे शाखा, अनिता बागुल क्रांतीचौक येथून एम वाळूज, शेख सरवर यांची जिन्सी येथून हायकोर्ट सुरक्षा, कल्याण शेळके सिडको येथून गुन्हे शाखा, अश्लेषा पाटील यांची सिडको येथून नियंत्रण कक्ष, राजेंद्र कांबळे नियंत्रण कक्ष येथून हर्सूल, दत्ता शेळके यांची विशेष शाखा येथून गुन्हे शाखा,
सुवर्णा उमाप यांची दामिनी पथक, गजानन इंगळे यांची सिटी चौक, श्रीकांत भराटे यांची मुकुंदवाडी, सुखदेव काळे यांची मुकुंदवाडी, भावसिंग राठोड यांची बेगमपुरा, प्रशांत मुंडे यांची सिटी चौक, भागवत मुठाड यांची पैरवी, वैशाली गुळवे यांची मुकुंदवाडी, कैलास जाधव यांची वाहतूक पोलीस, उत्तत्रेश्वर मुंढे यांची वेदांत नगर, चैनसिंग गुसिंगे यांची नियंत्रण कक्ष या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.