शहराला ‘गुलाबाचा’ तडाखा, शहराची उडाली दाणादाण; अनेक भागात साचले पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात आज मंगळवारी (ता.२८) झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सोमवारी (ता.२७) व आज मंगळवारी (ता.२८) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या चक्रीवादळामुळे आज मंगळवारी औरंगाबाद शहरात पहाटे १२:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली. अनेक सखल भागात पाणी जमा झाले आहे.

काही लोकांच्या घरात, दुकानात पण पाणी शिरले आहे. विद्यानगर वार्डात वेदमंत्रा अपार्टमेंटसमोर तसेच अलंकार सोसायटीमध्ये समर्थ अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले आहे. क्रांती चौक वार्डात सिध्देशनगर भागात देखील नाल्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाणी घुसले होते. त्या भागातील अभियंते नाना पाटील, परदेशी यांना सांगून ताबडतोब जेसीबी यंत्राने नाल्याचा प्रवाह वाहता केल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही.

शहरातील पावसाचे अपडेट्स
– बायपास बंद. प्रशांती हाॅटेलचा नाला भरून पाणी रस्त्यावर
– नागेश्वरवाडी, दलालवाडी, जाफरगेट, समर्थनगर, गारखेड्यात पाणीच पाणी सुंदरनाला भरून वाहू लागला
– खाम, सुखना नदीला पूर
– सखल भागात झपाट्याने पाणी शिरू लागले
– बारूदगर नाल्यावरील घरात पाणी हिमायतबाग परिसरातील नागरिकांचे शाळेत स्थलांतर करण्याची तयारी…
– उल्का नगरीत झाड कोसळले. कैलासनगर येथे घरांमध्ये पाणी शिरले. हर्सूल तलावातून साडेतीन फूट पाण्याचा सांडवा सुरू
– मनपा मुख्यालयातील झाड कोसळले. तीन ते चार वाहनांचा चुराडा
– खाम नदी भरून वाहत असल्याने लोकांची पाणी पाहायला गर्दी
– हर्सूल तलावासमोरील पूल वाहून गेला, शहर व जटवाड्याचा संपर्क तुटला.

Leave a Comment