वर्क फ्रॉम होम करत असाल तर ही ट्रिक वापरून पहा; सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या तीव्र संपर्कात येतो तेव्हा आपले डोळे बऱ्याचदा बंद होतात. तसेच जेव्हा आपण त्याच सूर्यप्रकाशामध्ये मोबाइल फोन किंवा लॅपटॉप घेऊन बसतो, तेव्हा त्यांची स्क्रीन देखील काहीशी काळी दिसते आणि त्यांचा वापर करण्यास आपल्याला खूपच अडचण येते. आपण काय टाइप करत आहोत हे देखील कळत नाही. पण असे म्हणतात ना की प्रत्येक कठीण गोष्टीवर तोडगा देखील असतोच. अगदी तशाच प्रकारे, आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्यात आपण कितीही सूर्यप्रकाशामध्ये बसला तरीही आपल्याला काम करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ही ट्रिक सोशल मीडियावरही इतकी व्हायरल होत आहे की याचा उपयोग करून प्रत्येकजण त्याचा फायदा घेत आहे.

या ट्रिक नुसार आपण जर आपल्या लॅपटॉपच्या भोवती कार्डबोर्ड बॉक्स ठेवला तर तुम्हाला लॅपटॉप वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही किंवा कडक उन्हात लॅपटॉप गरम होणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल फोटो
डेली स्टारच्या वृत्तानुसार, एक लिंक्डइन युझर टॉम वुडने ही ट्रिक आजमावली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले, ज्याला अनेकांनी पसंती दिली आणि ती जोरदार पणे वापरली गेली. त्याने हे फोटो पोस्ट केले आणि लिहिले की, ‘वर्क फ्रॉम होमसाठी ही एक उत्तम टेक्निक आहे. माझ्या बागेत बसल्यानंतर मी माझा लॅपटॉप सहजपणे वापरण्यास सक्षम आहे आणि हे खूप मजेदार देखील आहे. मी सूर्यप्रकाशाचा आनंदही घेऊ शकतो आणि कामही आरामात करू शकतो.

हजारो लोकांना ही ट्रिक आवडली
लिंक्डइनवर त्याच्या पोस्टला 50,000 लाईक्स मिळाल्या आहेत. एकाने कमेंटपणे लिहिले की मी आधी या कल्पनेचा विचार का नाही केला. एकाने लिहिले, ओ माय गॉड जीनियस. मी आता हे दररोज वापरेन. त्याच वेळी, एकाने या ट्रिक बद्दल टॉम वुडचे आभार मानले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment