हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टँकरच्या गळतीमुळे तब्बल 24 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. आता याबाबत पुढील माहिती मिळाली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती नाशिक पोलिस विभागाने दिली आहे.
An inquiry committee of seven persons under the chairmanship of Divisional Commissioner Radhakrishna Game has been constituted to investigate the oxygen leak incident at Dr. Zakir Hussain Hospital, Nashik on April 21: Nashik Police pic.twitter.com/kVdJOeqqlN
— ANI (@ANI) April 23, 2021
नाशिक घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेला कोण जबाबदार आहे त्याची गय केली जाणार नाही त्यांच्यावर तोंडात घेणार असल्याचं राज्यसरकारने म्हंटले होते. आता या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. नाशिक ऑक्सिजन टँकर गळती ची दुर्घटना निष्काळजीपणामुळे घडली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम कलम 304अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची घटना
21एप्रिलला नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67होती . माहितीनुसार आतापर्यंत २२ हुन अधिक रुग्ण दगावले असल्याची माहिती मिळाली आहे.
टॅंक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला होता. या दरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टॅंक हा 20 KL क्षमतेचा होता. या घटनेनंतर मात्र रुग्णालय परिसरात एकच धावपळ सुरू झाली. या घटनेचा शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा अशी घटना घडू नये याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.