गुमला : वृत्तसंस्था – झारखंडच्या गुमला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गुमला शहरातील आंबेडकर नगरमध्ये राहणारी गुडिया देवीने गरीबीमुळे आपल्या पोटच्या बाळाची विक्री केली आहे. तिने नुकताच या बाळाला जन्म दिला होता. हरिजन भागातील एका कुटुंबाने 5 हजार रुपयांत नवजात बाळाला विकले होते.
घरातील गरिबीमुळे गुडियाची दोन मुले आकाश कुमार आणि मुलगी खुशी कुमारी हे दोघेजण पाटनाजवळील बिहटामध्ये वीट भट्टीवर काम करतात. तिसरी मुलदी दीपावली 3 वर्षांची आहे. चौथ्या बाळाला गुडियाने विकले आहे. या घटनेची माहिती जेव्हा प्रशासनाला समजली तेव्हा ते त्यांच्या घरी गेले. आणि त्यांना साडी, धान्य आणि पांघरायला दिले. या कुटुंबाला प्रशासनाकडून एक महिना पुरेल इतकं अन्न-धान्य या कुटुंबाला देण्यात आले तर काही पैसेदेखील देण्यात आले.
तसेच प्रशासनाने गुडियाला तिचे मुलं परत करण्याचे निर्देश दिले आहेत. गुडिया आणि तिचे कुटुंब सिमडेगा येथील रहिवाशी आहेत. तसेच या कुटुंबाला सरकारी योजनांशी जोडून देण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गुडिया देवी हिला क्षयरोग आहे.