नक्षलवाद्यांनी ६ दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या जवानाला पत्नीच्या एका विनंतीवरुन दिले सोडून !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ४ मे रोजी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका जवानला पळवून नेले. हा जवान ६ दिवस नक्षलवाद्यांच्या ताब्यात होता. नक्षलवाद्यांनी त्या युवकाचे डोळे बांधून त्याला जंगलात लपवून ठेवले आणि त्यानंतर त्या जवानाची बायको आपल्या नवऱ्याला सोडण्यासाठी दररोज भटकत राहिली. अखेरीस त्या जवानांची बायको काही पत्रकारांसह नक्षलवाद्यांच्या जनअदालत येथे पोहोचली आणि आपल्या नवऱ्याला सुखरुप परत आणले.

विजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम येथे पोलिस हवालदार पदावर तैनात असलेले संतोष कट्टम ४ मे रोजी गोरणा गावात जत्रेला गेले होते. तेथे नक्षलवाद्यांनी त्याचे अपहरण केले. नक्षलवाद्यांनी त्या युवकाचे डोळे बांधले आणि त्याला आपल्या गडावर नेले. जेथे एकीकडे संतोष कट्टम हा तरुण आपल्या मृत्यूची वाट पहात होता, तर दुसरीकडे आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी त्याची पत्नी सावित्री दररोज जंगलातून त्याला शोधत फिरत होती.

2 Naxals arrested in Chhattisgarh's Bijapur - India News

यावेळी संतोषच्या सुटकेसाठी विजापूरचे काही पत्रकार पुढे आले. त्यांना बातमी मिळाली की सोमवारी नक्षलवादी संतोषला शिक्षा देण्यासाठी जन अदालत बोलावत आहेत. नक्षलवाद्यांच्या गढीतील या सामूहिक कोर्टात सावित्री पत्रकारांसह पोहोचली. त्यांना एक १० वर्षाची मुलगीही आहे. नक्षलवाद्यांसमोर सावित्रीने आपल्या पतीच्या जीवनदानासाठी विनवणी केली आणि शेवटी पोलिसांची नोकरी सोडण्याचे वचन घेऊन नक्षलवाद्यांनी त्यांना सोडून दिले.

नक्षलवाद्यांच्या या सामूहिक कोर्टात आजूबाजूच्या गावांमधून दीड हजाराहून अधिक गावकरी दाखल झाले होते. या अपहरणची संपूर्ण घटना नक्षलवाद्यांच्या गंगलूर एरिया कमिटीने घडवून आणली होती. नक्षलवादी नेते दिनेश मोदीयम यांनी म्हटले आहे की, हवालदार संतोष यांनी पोलिसांची नोकरी सोडून शेती करून आपला उदरनिर्वाह चालवावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.