हेडफोन लावून गाणे ऐकणे पडले महागात! तरुणीचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – अनेकदा आपली एक चुक आपल्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना एका महाविद्यालयीन तरुणीच्या बाबतीत घडली आहे. त्या एका चुकीमुळे त्या तरुणीला आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ ही घटना (accident) घडली आहे.

काय घडले नेमके?
प्रियंका नामदेव कोकणे असे 17 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. हि घटना (accident) घडली तेव्हा प्रियंका महाविद्यालयात जाण्यासाठी इगतपुरीच्या दिशेने चालली होती. प्रियंका पायी चालत असतांना मोबाईलला हेडफोन लावून गाणे ऐकत होती. घरापासून प्रियंका दररोज काही अंतर हे पायी चालत असल्याने हेडफोनवर गाणे ऐकत जाण्याची दररोज तिला सवय होती. यादरम्यान ती जानोरी रेल्वे फाटकाजवळ असतानादेखील तिचे हेडफोन तसेच होते.

यादरम्यान हेडफोनचा आवाज मोठा असल्यामुळे तिला मागून येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. यानंतर ट्रेनची धडक बसून प्रियांकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी महाविद्यालयातील या तरुणीचा असा मृत्यू (accident) झाल्याने संपूर्ण महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या तरुण मुलीचा असा रेल्वे अपघातात (accident) मृत्यू झाल्याने प्रियांकाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या