केंद्रीय प्राधिकरणाचे पथक प्राणीसंग्रहालयासह सफारी पार्कच्या कामाची करणार पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | प्राण्यांचे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले पिंजरे, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष यामुळे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय वादात सापडले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने 28 त्रुटी काढून त्यांची पूर्तता करण्याचे आदेश तीन वर्षापूर्वी दिले होते. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचे पथक शुक्रवारी शहरात येत आहे. पथकाचा दोन दिवस मुक्काम असून, प्राणिसंग्रहालयात सह सफारी पार्कच्या कामाची पहाणी हे पथक करणार आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानाणे तीन वर्षांपूर्वी रद्द केली होती. त्यावेळी प्राणिसंग्रहालयाची अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेली पिंजरे व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या नियोजित कामाकडे केलेले दुर्लक्ष यावर आक्षेप घेण्यात आला होता. प्राधिकरणाने 28 त्रुटी काढून त्यांची पूर्तता करण्याची सूचना केली होती. दरम्यान, महापालिकेचे तत्कालीन पदअधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी मान्यता कायम ठेवण्यासाठी दिल्लीत पाठपुरवा केला. त्यामुळे प्रति कारणाने एक वर्षासाठी मान्यता दिली पण प्राणिसंग्रहालयात सुधारणा करण्याच्या अटींच्या अधीन राहून.

गेल्या 16 महिन्यापासून कोरोना संसर्ग असल्याने प्राणीसंग्रहालयाच्या पाहणीसाठी पथक आले नव्हते. आता करूनच संसर्ग कमी झाल्याने डॉ. गोवरी मल्लापुर आणि टी. अजय कुमार मूल्यांकन व देखरेख सहाय्यक हे दोन सदस्यीय पथक शुक्रवारी व शनिवारी शहरात थांबून पाहणी करणार आहे अशी माहिती मिळत आहे. सफारी पार्कचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे स्थलांतरित केले जाणार आहे. नियोजित सफारी पार्कच्या प्रस्तावाला अद्याप केंद्रीय प्राणी संग्रहालय प्रदी कारणाने मंजुरी दिलेली नाही. दरम्यान, पथकातील अधिकारी सफारी क पार्कचे काम गतीने सुरू केले का याची देखील पाहणी करणार आहे.

Leave a Comment