साखरेची पोती घेऊन जाणारा ट्र्क टायर फुटल्याने पलटी; ड्रायव्हर जखमी

पुणे बंगळूर महामार्गावरील आणेवाडी परिसरात अपघात

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर महामार्गावर रविवारी साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्र्क जागीच पलटी झाला. सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर महामार्गावरील आनेवाडी पाटबंधारे वसाहतीलगत असणाऱ्या पुलावर हा अपघात झाला. यामध्ये बार्शी येथील राहणारा ट्र्क ड्रायव्हर अजय क्षीरसागर (वय २३) हा जखमी झाला आहे. ट्रकच्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे बंगळूर महामार्गावर रविवारी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने साखरेने भरलेला ट्र्क ( एमएच 09 सीवी 6657) निघाला होता. ट्रकचा वेग हा जास्त असल्याने त्याचा आनेवाडी पाटबंधारे वसाहती हद्दीत आल्यानंतर टायर फुटला. त्यामुळे तर्क दुभाजक फोडून पुणेकडील लेन सोडून सातारच्या दिशेकडील लेनवर जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रकची डिझेल टाकीही फुटली तसेच त्यातील डिझेल परिसरात पसरले.

या अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांनी भुईंज पोलिसांत दिली. त्याची माहिती मिळताच आनेवाडी टोल नाक्यावर असलेले वाहतूक शाखेतील पोलीस पवार व बोरसे हे अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील ट्र्क पलटी झालेल्या ठिकाणची वाहून थांबवली तसेच ती शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावरून सुरु केली. या अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे