Elon Musk यांच्या एका ट्विटने बदलले अनेक कंपन्यांचे भाग्य, या कंपन्यांविषयी जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती जगाची बाजारपेठ आणि कंपन्यांचे भाग्य कसे बदलू शकतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला इंक. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्पेस एक्सचे मालक Elon Musk यांनी हे दाखवून दिले आहे. आपल्याला हे ठाऊक असेल की, Elon Musk यांना इंटरनेट नेहमीच आवडते. अशा परिस्थितीत, ते बहुतेक वेळा सर्वात प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटरवर ऍक्टिव्ह राहतात आणि अधून मधून ट्विट करत असतात.

अलीकडेच Elon Musk यांनी केलेल्या काही ट्वीटस पाहिल्या तर त्यात ज्या ज्या कंपन्यांचा उल्लेख झाला आहे त्या त्या कंपन्यांच्या मार्केंटमध्ये अचानक तेजी आली. मग ते क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचे मूल्य असो किंवा चॅटिंग अ‍ॅप Signal असो किंवा ऑनलाइन रिटेलिंग प्लॅटफॉर्म Etsy असो. एलन मस्क यांनी जेव्हा जेव्हा या कंपन्यां बाबत ट्विट केले तेव्हा तेव्हा त्यांच्या मार्केंट कॅपमध्ये अचानक तेजी आली. चला तर मग जाणून घेउयात कि, अलीकडेच एलन मस्क यांनी आणखी कोण-कोणत्या कंपन्यांबाबतीत ट्विट केले आणि त्यांची मार्केट कॅप वेगाने कशी वाढू लागली…

इंटरनेट वर ‘द मस्क इफेक्ट’
Signal मेसेजिंग अ‍ॅप- एलन मस्क यांनी अलीकडेच व्हॉटस-अ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसी विरोधात सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप च्या सपोर्टमध्ये ट्विट केले आहे. त्यानंतर सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप वरील युझर्सची संख्या झपाट्याने वाढू लागली. ज्यामुळे सिग्नल अ‍ॅप चा सर्व्हर क्रॅश झाला. जो काही काळानंतर पूर्णपणे ठीक केला गेला. त्याच वेळी, एलन मस्क यांच्या एका ट्विटनंतर, सिग्नल अ‍ॅपची शेअर बाजारात पहिल्या तीन दिवसांत 5,100 टक्के वाढ दिसून आली. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी ही वाढ 885 टक्क्यांवर बंद झाली.

Bitcoin – टेस्ला इंक. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये फक्त “#bitcoin” असे लिहिले होते. यानंतर बिटकॉनमध्ये 14 टक्के वाढ दिसून आली. यावेळी, एक बिटकॉनची किंमत, 37,800 डॉलर वर पोहोचली.

DogeCoin – एलन मस्क यांनी एका डिजिटल मासिकाचे कव्हर पेज ट्वीट केले. ज्यामध्ये एक Dog क्रिप्टोकरन्सी DogeCoin ला सपोर्ट करत होता. या ट्विटनंतर DogeCoin ची मार्केट कॅप 800 टक्क्यांनी वाढली.

CyberPunk – एलन मस्क यांच्या ट्विटनंतर पोलिश गेम डेव्हलपर सीडी प्रोजेक्टच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली. तर एलन मस्क यांनी या ट्विट मध्ये फक्त “The esthetics of Cyberpunk are incredible btw….” असे लिहिले होते.

Etsy- एलन मस्क यांनी ऑनलाइन रिटेलिंग प्लॅटफॉर्म Etsy बद्दलही ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की,”I kinda love Etsy”. ज्यानंतर Etsy चे शेअर्स 9 टक्क्यांनी वाढले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment