औरंगाबाद – ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काल कॅनॉट परिसरात सकाळी 7 ते 9 यावेळेत झुंबा त्याबरोबरच दिवसभरात कला कार्यशाळा, खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, स्वसंरक्षण कार्यशाळा, लाईव्ह म्युझिक हे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना सर्वच वर्गातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने आजपासून दोन दिवस म्हणजेच 2 आणि 3 ऑक्टोबर दरम्यान देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांती चौक येथे 2 ऑक्टोबरला सकाळी 7 ते 9 या वेळेत फ्रीडम वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकचे उद्घाटन खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते होणार आहे. क्रांती चौक ते अहिल्याबाई होळकर चौक आणि परत क्रांती चौक असे या वॉकचे स्वरूप आहे. यामध्ये लेझिम, एनएसएस मार्च यांचे प्रात्यक्षिक देखील होणार आहे. 2 ऑक्टोबर 2021 ला सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत कला कार्यशाळा, दुपारी 2 ते 4 या वेळेत पाककला कार्यशाळा व हस्तलेखन आणि मेहंदी कार्यशाळा, दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत पालकत्व कार्यशाळा (1-8 वर्ष), दुपारी 3 ते 4 या वेळेत रांगोळी स्पर्धा, संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत खेळ आणि फिटनेस कार्यशाळा तर दुपारी 4 ते 6 या वेळेत स्वसंरक्षण कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत कला कार्यशाळा आणि इंग्रजी बोलणे कार्यशाळा, पाककला कार्यशाळा, दुपारी 2 ते 4 या वेळेत सुलेखन आणि मेहंदी कार्यशाळा, दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत पालकत्व कार्यशाळा (1-8 वर्ष), संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, तर दुपारी 4 ते 6 या वेळेत स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरीही नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने, कोरोनाचे नियम पाळून या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.