महिला डॉक्टरांनी पीपीई किट घालून केलेला अनोखा डान्स होतोय व्हायरल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

बीड : जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. यात महिला डॉक्टर गाण्याचा तालावर थिरकताना दिसत आहेत.

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती आणि स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली. अनेक डॉक्टर आणि नर्स यांना अठरा आठरा तास सेवा करावी लागली अस असतानाही अशा तणावग्रस्त वातावरणात ताण घालवण्यासाठी महिला डॉक्टर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या या नृत्यामुळे लोकामध्ये एक सकारात्मकता मिळत आहे.

आता अंबेजोगाई येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. 10 दिवसापूर्वी अंबेजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 हुन अधिक रुग्ण आढळत होते. मात्र ती संख्या आता 50 हुन कमी झाली आहे. त्यामुळं या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याच चित्र दिसतंय. त्यामुळेच मागील महिना भरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टर यांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर . मोठया प्रमाणावर व्हायरल होतोय.