कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बेंगलोर महामार्गावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर पाठीमागून धडक दिल्याने व्हॅगनार गाडी पलटी झाली. कराड जवळ असलेल्या गोटे गावच्या हद्दीत आज दुपारी बारा वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दिनांक 31/8/2022 दुपारी 12 वाजता गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत हाॅटेल महेंद्रा समोर सातारा ते कराड लेन वरती हा अपघात झाला. व्हॅगनार कार चालली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या होंडाई VENUE गाडीने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की व्हॅगनार गाडी चालकाचा ताबा सुटला अन् गाडी डिवायडरला धडकुन रस्त्यावर पलटी झाली. त्यामध्ये दोघे जण किरकोळ जखमी झाले व होंडाई गाडीतील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने कराड येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन व कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचार पाठवून दिले आणि महामार्गावरील वहाने बाजूला काढून रस्ता सुरळीत केला. अपघातामुळे काही वेळ महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते. यावेळी काही वहाने सर्विस रोड वरून सोडण्यात आले. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, विक्रम सावंत, विशाल होवाळ व कराड शहर पोलिस स्टेशनचे खालीद इनामदार, प्रशांत जाधव यांनी जखमींना मदत केली.