मध्यरात्रीची घटना : गैरफायदा घेणाऱ्या पतीच्या मित्राच्या अंगावर महिलेने ओतले उकळते तेल

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | वाई शहरातील गणपती आळीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात तिचा पती नसलेचा गैरफायदा घेऊन पतीच्याच मित्राने महिलेला मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी त्या महिलेने पतीच्या मित्राला प्रतिकार करण्यासाठी धडा शिकविण्यसाठी चक्क उकळते तेल त्याच्या अंगावर टाकले. विशाल विजय गायकवाड असे तरूणांचे नांव असून तो या घटनेत 30 टक्के भाजला आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई शहरातील गणपती आळीमधील एका अपार्टमेंटमध्ये एक २४ वर्षीय विवाहीत महिला आपल्या पतीसह राहण्यास आहे. पतीचा मित्र विशाल विजय गायकवाड (वय २४ रा. डांगे कॉलनी, यशवंत नगर- वाई) हा सतत घरी ये- जा करत असतो. संमधीत विवाहीत महिलेची त्याच्या सोबत ओळख झाली होती. दि १० मे रोजी विवाहितेचा पती घरी नसलेची माहिती विशाल विजय गायकवाड याला होती. तेव्हा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पतीचा मित्र घरात गेला, त्याने महिलेस मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यास सुरुवात केले. यावेळी महिलेसोबत शाब्दिक वाद सुरु झाला, तरीही विशाल गायकवाड हा ऐकत नसल्याचे पाहुन विवाहितेने प्रतिकार करण्यास सुरूवात केली.

यावेळी गायकवाड यास कायमचा धडा शिकविण्यासाठी महिलेने गॅसवर कडईमध्ये तेल उकळले आणि तेल समोरुन तोंडावर टाकले. त्यात विजय गायकवाडचे तोंड, छाती, पोट, पाय असे भाजल्याने तो त्यात ३० टक्के भाजुन गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती वाई पोलिसांना लागताच सपोनि रविंद्र तेलतुमडे, सहाय्यक फौजदार आर. झेड. कोळी, पोलिस अजीत जाधव, महिला पोलिस स्वाती कदम, सुतार हे सर्वजण घटनास्थळी गेले. त्यांनी गंभीर जखमी असलेला विशाल गायकवाड यास वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पण तेथे योग्य ऊपचारांची सोय नसल्याने त्यास नातेवाईकांनी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असुन त्याचा अधिक तपास सहाय्यक फाैजदार रमेश कोळी करीत आहेत.