हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहान गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत महिलांवरील अत्याचाराची संख्या प्रचंड वाढली आहे. या अत्याचाराला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमी विविध योजनांची अंमलबाजवणी करत असतात. पण कठोर कायदे आणि उपाययोजनांनंतरही या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले नाही. एका पाठोपाठ बलात्काराच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक बलात्काराची बातमी पुण्यातून समोर आली असून, यामध्ये आरोपीने माझ्या अंगात देव येतो असं बोलून एका महिलेवर बलात्कार केला आहे. तर हि नक्की घटना काय आहे , आणि कुठे घडली आहे हे आपण पाहणार आहोत.
माझ्या अंगात देव येतो असं सांगून बलात्कार –
राजगुरुनगरच्या घटनेच्या धक्क्यातून पुणे सावरत असतानाच, बिबवेवाडी भागात एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडली आहे. आरोपीने माझ्या अंगात देव येतो असं सांगून चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. या पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या घटनेबद्दल सर्व माहिती समोर येईल.
काही महिन्यांपूर्वीच्या घटना –
काही महिन्यांपूर्वी बोपदेव घाटातही अशाच स्वरूपाचा गुन्हा घडला होता. रात्री फिरायला गेलेल्या एका तरुणीसोबत तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली, त्याचे हातपाय बांधून ठेवले. परराज्यातून आलेल्या या तरुणीवर झालेल्या घटनेनेही पुण्यात संतापाचा आवाज उठला होता. तसेच दुसरी घटना म्हणजे 54 वर्षीय आरोपीने दोन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केली . या घटनांमुळे पुण्यात तसेच इतर भागातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.