मेट्रोत तिकिट काढण्याची झंझट मिटणार!! आता प्रवाशांसाठी ही नवी प्रणाली उपलब्ध होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील मुंबई नागपूर आणि पुणे शहरांमध्ये सुरू करण्यात आलेली मेट्रो (Metro) दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. आता या मेट्रोकडूनच प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रोने या नव्या सुविधेत कागदी तिकीट आणि तिकीटचा पर्याय हटवून टाकला आहे. त्यामुळे आता फक्त मनगटी पट्टा (Wrist Band) स्कॅन करून मेट्रो 1 मधून प्रवास करता येणार आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. यासोबत त्यांना तिकीट काढण्यासाठी अधिक कष्ट उचलावे लागणार नाही.

मेट्रोकडून ही नवीन तिकीट प्रणाली मुंबईतील घाटकोपर, अंधेरी, वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवास करताना कोणत्याही प्रवाशाला कागदी तिकीट किंवा ई तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन सुद्धा करावे लागणार नाही. या उलट आता प्रवाशांना मनगटी बँड (Hand Band) स्कॅन करून मेट्रो मधून प्रवास करता येईल. ही सुविधा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून आणली गेली आहे.

किंमत किती असणार?

मेट्रोचे कागदी तिकीट खूपच लहान असल्यामुळे ते हरवून जात असत. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून मोबाईल ई तिकीट काढण्यात आले. परंतु आता यावर देखील एक उत्तम पर्याय मेट्रोने शोधून काढला आहे. या नव्या पर्यायामुळे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. कोणत्याही प्रवाशाला फक्त मनगटी बँड स्कॅन करून मेट्रोले प्रवास करतात. या बँडची किंमत 200 रुपये इतकी असणार आहे.

हा मनगटी बँड मेट्रो 1 च्या सर्व स्थानकावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा बँड रोज वापरणाऱ्या घड्याळासारखा असेल. हा प्रवाशांना फक्त 200 रुपयात खरेदी करता येईल. तसेच, या बँडचा रिचार्ज ही करता येईल.
खास म्हणजे, हा बँड जलरोधक आणि टिकाऊ असल्यामुळे तो तिन्ही ऋतूंमध्ये वापरता येईल. या बँडची निर्मिती बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीनं केली आहे.