वाकड्या पुलावर क्षेत्रमाहुलीच्या युवकाचा अपघातात जागीच मृ्त्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरेगाव | वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक येथे वाकड्या पुलावर संरक्षण कठाडे नसल्याने मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुलावरून खाली गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील युवक लखन राजगे (वय- 27) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लखन राजगे हा वाठार स्टेशनवरून पिंपोडे बुद्रुकच्या दिशेने हिरोहोंडा स्प्लेनडर या दुचाकीवरून क्रमांक (एमएच- 11- बीयू – 1815) चालला होता. वडिलांना वाठार स्टेशन येथे सोडून पुढे निघाल्यानतर हा अपघात झाला. यावेळी या रस्त्यावरील वाकड्या पुलावर गेल्यावर गाडीवरील ताबा सुटल्याने तो थेट पुलाला संरक्षण कठाडा नसल्याने खोल पुलावरून खाली कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना कळताच वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि स्वप्नील घोंगडे, पोलीस कर्मचारी तुषार आडके, अतुल कुंभार, धुमाळ, चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर संताप व्यक्त केला. वेळोवेळी मागणी करूनही निगरगट्ट अधिकाऱ्यांना कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. अपघाताची नोंद वाठार पोलिस ठाण्यात झाली आहे.

Leave a Comment