हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराई म्हंटले की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच एकच धांदल उडून गेलेली असते. अशा कार्यक्रमातच सिंगल असलेले तसेच अविवाहित तरुण – तरुणी आपल्या प्रिय व्यक्तीच्या शोध घेत असतात. सध्या लग्नसराई जोरात सुरु असल्याने अशाच एका लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात आपल्या मित्राच्या लग्नात आलेल्या एका तरुणाने आपला फोन नंबर तरुणीला एका वेगळ्या अंदाजात दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. झाला असा प्रकार की, एका लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात तरुण नाचत होते. त्या ठिकाणी त्या तरुणांचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणींही आल्या होत्या. यावेळी नाचता नाचता एका तरूणाची एका मुलीवर नजर गेली. दोघांच्यात काहीवेळी अशीच नजरा नजर झाली. थोडा वेळ गेल्यानंतर ते दोघे एकमेकांकडे बघून हसू लागले.
दोघांच्यातील नजरा नजरेचा खेळ सुरु असताना घडतंय याची दोघांनाही कल्पना येते. मग तो नाचता नाचत आपले दोन्ही हात वर करत इशाऱ्याने फोन नंबर त्या तरुणीला देतो. सर्व नंबर दिल्यानंतर त्या शनीचा लगेच त्याला फोन येतो. त्यानंतर तो आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो. आणि हसत हसत मोबाईल नंबर मिळाल्याची माहितीही देतो. त्या दोघांनी एकमेकांना एका भन्नाट कल्पनेच्या माध्यमातून कोणाला काहीही कळू न देता फोन नंबर दिल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशा प्रकारे लग्न असतो किंवा काही कार्यक्रम त्यामधून आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला तरुण तरुणींकडून फोन नंबर दिले जात असल्याचे दिसून येत आहार. मात्र, या तरुणीने तरुणीला फोन नंबर देण्यासाठी लढवलेली शक्कल हि नामानिराळीच आहे. सध्या त्या तरुणाचा हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.