Video युवकाचा जीवघेणा स्टंट : साताऱ्यात घाटात बसमागील शिडीला लटकून प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात पोगरवाडीला जाणाऱ्या घाटात एसटी बसच्या पाठीमागील बाजूस धोकादायक पद्धतीने लटकून एक तरुण प्रवास करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या या हुल्लडबाज तरूणांवर प्रशिक्षकाचे नियंत्रण नसल्याने जीवघेणे स्टंट प्रशिक्षणार्थीकडून केले जात आहेत.

याबाबतची माहिती अशी, पोगरवाडी (ता. सातारा) येथील करिअर अकॅडमी पोलीस आणि आर्मी भरतीसाठी मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या मार्गावरच घाटातून आणि रस्त्यावर प्रशिक्षणार्थी मुले धावत असतात. रविवारी भर पावसात रस्त्यावर हे युवक अत्यंत धोकादायक पद्धतीने धावत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या हुल्लडबाज प्रशिणार्थी मुलांवर प्रशिक्षकाचे लक्ष नसल्यानेच हे धोकादायक उद्योग ही मुले करत आहेत.

या मुलांना लष्कर आणि पोलीस प्रशिक्षण घेऊन पुढे देश सेवा करणाऱ्यासाठी शिस्त व जबाबदारी देण्याचे काम अकॅडमी करते. मात्र, अशा बेजाबदारपणे मुले वागत असतील तर अकॅडमी चालक काय करत असतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एसटी बसच्या पाठीमागे स्टंट करताना हात निसटून अपघात झाल्यास याला एसटी चालकाला जबाबदार धरले जाते. मात्र एसटीच्या पाठीमागे काय प्रकार सुरू आहे, याची पुसटशीही कल्पना बसचालकाला नसते. या मुलांवर योग्यवेळी कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांच्यातून केली जात आहे.

Leave a Comment