बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला (a young man was attacked with a scythe) करण्यात आला. पाटलाच्या नादाला लागायचं नाही, असे म्हणत पीडित व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात (a young man was attacked with a scythe) आले. महेश उत्तमराव पैठणकर असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपींमध्ये माजी उपसरपंचाचा समावेश असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत केला कोयत्याने वार, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/IWSMbuqMbL
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 12, 2022
आरोपींमध्ये माजी उपसरपंचाचा समावेश
फिर्यादी महेश पैठणकर हा शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात 10 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उभा होता. यावेळी नितीन पाटील व सचिन पाटील यांच्या नादाला लागण्याच्या कारणावरून आरोपी स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर रा.शिवनगर माळेगाव याने महेशच्या डोक्यात आणि पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला (a young man was attacked with a scythe) केला. हि संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी स्वप्निल ऊर्फ पिल्या देऊळकर, नितीन वसंतराव तावरे पाटील, सचिन वसंतराव तावरे पाटील यांच्यावर विविध कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी उपसरपंच सचिन तावरे पाटील याचे नाव असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी महेश पैठणकर यांच्यावर (a young man was attacked with a scythe) बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर