पुण्यामध्ये भर रस्त्यात तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ घडली आहे. यामध्ये पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
मारुती लक्ष्मण ढेबे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हि हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. मृत मारुती ढेबे हा घटनेच्या दिवशी नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मारुती ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला केल्यानंतर आरोपी अल्टो कारने घटनास्थळावरून फरार झाले.

भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.

Leave a Comment