औरंगाबाद : गेल्या एक वर्षापासून एक तरूण रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करत असल्याचे समोर आले आहे लासूर परिसरातील भानेवाडी येथील हा तरुण असून जास्तीच्या दराने दहा युजर आयडीच्या माध्यमातून तिकीट बुक करून देत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलास समजताच त्याला अटक करण्यात आली.
सागर त्रिभुवन (वय 24) रा. लासूर, (भानेवडी) असे काळाबाजार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याला मंगळवारी ताब्यात घेतले आहे. हाती आलेल्या माहितीनूसार हा तरुण परराज्यातील मजुरांना तिकीट 50 ते 100 रुपयांनी चढत्या दराने विक्री करत असत. त्याच्याकडून 39 हजार 112 रुपये, 34 ई- रेल्वे तिकिटानसह मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा, उपनिरीक्षक के. चंदूलाल, सहायक उपनिरीक्षक विजय वाघ, हेड कॉन्स्टेबल सुनील नलावडे, कॉन्स्टेबल यु. आर. डोभळ, अजित सिंघ यांनी ही कारवाई केली.