औरंगाबाद : एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण होत आहे. आणि त्यात डेल्टा प्लसचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मंगळवारी लॉकडाऊन जाहीर केले. त्याअंतर्गत काही निर्बंध लावण्यात आले. आता बुधवारपासून त्यात काही सुधारणा करण्यात आली आल्या आहेत. आता शनिवारी आणि रविवारी देखील मंगलकार्यालय आणि हॉटेल यांना परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारपासून लॉकडाऊन जारी केले होते. मात्र, बुधवारी यात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. लग्न समारंभाला आता शनिवारी आणि रविवारी परवानगी देण्यात आली आहे. काही लोकांनी पहिलेच लग्नाच्या तिथी काढण्यात आल्या होत्या. त्यात जास्त तारखा या शनिवारी आणि रविवारी काढण्यात आल्या होत्या. पण या आदेशामुळे लोकांना खूप अडचणी निर्माण होत असून त्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी शनिवारी आणि रविवारी लग्नाला परवानगी दिली आहे.
या परवानगीमुळे हॉटेल आणि मंगलकार्यालयांना दिलासा भेटला आहे. पर्यटन स्थळ हे सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, वेरुळ लेणी हे पाच पर्यटन स्थळ 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सकाळी 500 आणि दुपारी 500 लोकांना आत प्रवेश भेटणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर पुरवढ्यासाठी आता सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. आणि केवळ होम डिलिव्हरीसाठी रात्री आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.