Thursday, February 2, 2023

विवाहितेला लग्नासाठी बळजबरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

- Advertisement -

औरंगाबाद | फिरण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा वाईट उद्देशाने हात पकडून माझ्याशी लग्न कर अन्यथा जबरदस्ती घेऊन जाईल असे म्हणत, तिला वाईट हेतूने स्पर्श करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 4 जुलै रोजी वॉकिंग प्लाझा येथे घडली. वेदांतनगर पोलिसांनी विवाहितेचा विनयभंग करणारा अजय घनश्याम वय 32 (रा. पदमपुरा) याला शनिवारी अटक केली आहे. रविवार पर्यंत अजयला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी डी. एस. यांनी दिले आहे

32 वर्षीय विवाहितिने फिर्याद दिली. त्यानुसार, 2017 मध्ये तिचे लग्न झाले होते. मात्र, ती तिच्या पतीपासून दूर राहत होती. तिचे आणि त्याचे सतत वाद होत असल्याने ती अडीच वर्षापासून मुली सोबत माहेरी राहत होती 4 जुलै रोजी बारा वाजेच्या सुमारास वॉकिंग प्लाझा येथे फिरण्यासाठी गेले असता, त्यावेळी अजय तिथे आला तिचा हात पकडून माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुला जबरदस्ती घेऊन जाईल. वाईट स्पर्शाने तिच्या अंगाला हात लावत होता. तुझ्यावर बळजबरी करायला मला काहीच वेळ लागणार नाही असे म्हणाला, त्यावेळी पीडितेने स्वतःचा हात सोडवून ती तिथून निघून गेली आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

- Advertisement -

त्यानंतरही तो मोबाईल विविध क्रमांकावरून तिला सतत कॉल करून त्रास द्यायचा. यानंतर पीडितेने वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सहकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी मोबाईल क्रमांक याचा तपास करणे बाकी असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.