तब्बल 6 हजार फूट उंचीवरून तरुणाचा रोप-वॉक; व्हिडिओ पाहताच थरकाप उडेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कधी कोण लय करेल याचा काही नेम नाही. काही वेगळ्या गोष्टी करून अनेक जण आपलं लक्ष वेधून घेत असतात तर काही जण अस करतानाच विश्वविक्रम करतात. अशाच एका व्यक्तीने चक्क 6 हजार फुट उंचीवरून चालताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राफेल जुग्नो ब्रिडी असे या व्यक्तीचे नाव असून तो ब्राझील मध्ये राहतो. राफेल ब्रिडी यांने तब्बल 6326 फुट उंचीवर चालत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या विश्वविक्रमाची गिनीज बुक ने नोंद घेतली आहे. राफेलची ही अविश्वसनीय कामगिरी पाहून लोकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/reel/Cb8jwSJDsot/?utm_source=ig_embed&ig_rid=068261c1-2757-4a3e-a8d1-18a2a2b89754

या व्हिडिओ मध्ये राफेल दोन एअर बलूनमध्ये बांधलेल्या स्लॅकलाइनवर चालताना दिसत आहे. ज्या उंचीवरून राफेलने रोप वॉक केला ही ती उंची जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्याही दुप्पट आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमचाही थरकाप उडाला असेल हे मात्र नक्की.

Leave a Comment