कासजवळ धबधब्यात पाय घसरून पडलेल्या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कासजवळ असलेल्या एकीव येथील पाबळ नावाच्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने श्वेता मुकुंद साठे (वय- 18, रा.गोडोली, सातारा) ही युवती शनिवारी गंभीर जखमी झालेली होती. रविवारी रात्री उशिरा एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.

सातारा शहरातील 5 मैत्रिणी शनिवारी दि. 21 रोजी कासजवळ असणारा एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत असताना, श्वेता साठे ही युवती निसरड्या दगडावरून पाय घसरून धबधब्यात कोसळली. सुमारे 40 फूट खोल असलेल्या दगडावर ती आदळल्याने गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली. आपली मैत्रीण धबधब्यात पडल्याने सोबत असलेल्या युवतींनी आरडाओरडा केला. त्यानंतर, स्थानिक लोक गोळा झाले. त्यांनी जखमी युवतीला धबधब्यातून बाहेर काढले होते.

या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे. जखमी युवतीवर साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यासाठी नेण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.

Leave a Comment