Tuesday, February 7, 2023

तोरणा किल्ल्यावर सैदापुरातील युवकाचा डोक्यावर दगड पडून मृत्यू

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील सैदापूर येथील एका युवकाचा तोरणा किल्ल्यावर डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओम महेशकुमार भरमगुंडे (वय 21, रा. सैदापूर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील सैदापूर येथील ट्रेकर असणारा ओम भरमगुंडे हा पुणे येथे शिक्षणासाठी होता. दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसमवेत वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्यावर ट्रेकिंगसाठी गेला. किल्यावर ट्रेकिंग करीत असताना अचानकपणे वरील बाजुकरून त्याच्या डोक्यावरती दगड पडला.

डोक्यावर दगड पडल्याने त्याचा यामध्ये मृत्यू झाला. ओम हा वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक महेशकुमार भरमगुंडे यांचा मुलगा आणि हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांचा भाचा आहे. दरम्यान रात्री उशिरा ओमचे पार्थिव कराड येथे आणण्यात आले.