कोकणात पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील युवकाचा अपघातात मृत्यू

सातारा | फत्यापूर (ता. सातारा) येथील कोकणात पर्यटणासाठी गेलेल्या युवकांच्या गाडीला झालेल्या अपघातामध्ये फत्यापूर येथील पंकज भगवान घाडगे (वय- 39) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने आज फत्यापूर येथे शोकाकूल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की फत्यापूर ता. सातारा येथील आठ युवक कोकण पर्यटन करून माघारी येत असताना त्यांच्या क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने खेड तालुक्यातील मौजी खवटि विनेर फाटा या परीसरात गाडी पलटि झाल्याने पंकज घाडगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारा दरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला तर यामध्ये इतर सात जनांना दुखापत झाली असून त्यांच्यावरहि उपचार चालू आहेत.

पंकज घाडगे हे देशमुखनगर येथील आयडीबीआय बँकेत सेवा बजावत होते. त्यांचा या परीसरात लोकसंपर्क मोठा असल्याने त्यांच्या निधनाची वार्ता समजताच फत्यापूरसह परीसरातील गावांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच देशमुखनगर बाजारपेठ स्वयमस्फुर्तीने बंद ठेवन्यात आली, पंकज यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परीवार आहे.

You might also like