धक्कादायक ! अकोल्यात रात्री दगडाने ठेचून तरुणाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोला शहरात रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाची चाकूने वार करत दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली. विनोद टोंबरे असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अकोला शहरातील न्यू तापडिया नगरमधल्या गणपती मंदिरासमोर हि हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्या (Murder) झालेला युवक हा पंचशीलनगर या ठिकाणचा रहिवाशी होता. हि हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सिव्हिल लाईन्स पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
विनोद टोंबरे याची पूर्व वैमनस्यातून हत्या (Murder) केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुरुवातीला विनोदला चाकूने भोसकण्यात आलं. त्यानंतर दगडानं ठेचून ही हत्या करण्यात आली. हि हत्या (Murder) केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. सिव्हिल लाईन्स पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकांमध्ये भीतीचं वातावरण
या हत्येमुळे (Murder) संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हि हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे जरी समोर आले असले तरी हि हत्या (Murder) नेमकी कशामुळे झाली हे पोलीस तपासात समोर येईल.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य