मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो पाहून अजूनही ते ठाकरे कुटुंबापासून दूर गेलेले नाहीत हे मात्र समजले. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाडी एकादशीच्या महापूजेच निमंत्रण देण्यात आलं. यावेळी शिंदेंच्या घरातील भिंतीवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या फोटोनी लक्ष्य वेधले.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा असताना आषाडी एकादशीला महापूजेचा मान कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याने तेच विठ्ठलाची पूजा करतील हे नक्की झालं. याच पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाडी एकादशीच्या महापूजेच निमंत्रण देण्यात आलं. यावेळी शिंदेंच्या घराती ठाकरे कुटुंबाचे फोटो लक्ष वेधून घेत होते. एकनाथ शिंदेंच्या घरात आजही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहे तसेच आहेत.

दरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत सत्ता नको ही मागणी करत एकनाथ शिंदे यांनी तब्बल 50 हुन अधिक आमदारांसह बंडखोरी केली. येवडच नव्हे तर भाजपसोबत सत्तास्थापन करून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यातील मतभेद जगासमोर आले. पण आज शिंदेंच्या घरातील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा फोटो पाहून त्यांचा ठाकरे परिवारा सोबतचा घरोबा कायम असल्याचे दिसले.

Leave a Comment