बिझनेस करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 21 ऑगस्टपासून बदलले GST रजिस्ट्रेशनशी संबंधित ‘हे’ नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST) अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करताना आपला आधार क्रमांक देणार्‍या व्यवसायांना आता तीन कामकाजी दिवसांमध्ये त्यांची मंजुरी मिळेल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (CBIC) गेल्या आठवड्यात 21 ऑगस्ट 2020 पासून लागू असलेल्या GST नोंदणीसाठी आधारच्या ऑथेंटिकेशनला अधिसूचित केले. या अधिसूचनेनुसार, जर व्यवसायांनी आपले आधार क्रमांक दिले नाहीत तर त्यांच्या फिजिकल पडताळणीनंतरच त्यांना GST नोंदणी दिली जाईल. वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की 14 मार्च 2020 रोजी झालेल्या GST परिषदेच्या 39 व्या बैठकीत नवीन करदात्यांना आधार ऑथेंटिकेशनच्या आधारे GST नोंदणीस मान्यता देण्यात आली.

मात्र, कोविड 19 साथीमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. सूत्रांनी सांगितले की फिजिकल व्हेरिफिकेशन साठी 21 कार्य दिवस किंवा त्याहून अधिकचा कालावधी लागू शकेल.

आधार ऑथेंटिकेशनद्वारे GST नोंदणीस त्वरित मंजुरी मिळाल्यास सर्व भारतीय नागरिक लाभ घेऊ शकतात. टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, ऑनलाइन इंफॉर्मेशन डेटाबेस एक्सेस आणि रिट्राइवल सर्विसेज (OIDARs), टॅक्सपेयर्ससाठी अनन्य ओळख क्रमांक (UIN) आणि नॉन-रेसिडेंट्स टॅक्सपेयर्ससाठी आवश्यक नाहीत. या सुविधेबद्दलच्या अधिक माहितीसाठी, कृपया GST पोर्टलच्या न्यूज आणि अपडेट सेक्शनमध्ये भेट द्या.दोन्ही प्रकरणांमध्ये, संबंधित अधिका-याने ठराविक वेळेत काम करणे आवश्यक आहे – आधार ऑथेंटिकेशनची निवड करणार्‍यांसाठी 3 दिवस आणि ज्यांची आधार ऑथेंटिकेशन होत नाही त्यांच्यासाठी 21 दिवस.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.