हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट (Aadhaar Card Free Update) करण्याची मुदत सरकारने आणखी वाढवली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 म्हणजेच आज होती आणि आता ही तारीख पुढील तीन महिन्यांसाठी आणखी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अजूनही आपले जुने आधार कार्ड अपडेट केलेलं नाही अशा व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. क आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिलेली नवीन तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे त्यापूर्वी आता जुने आधारकार्ड अपडेट करावं लागेल.
१० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची (Aadhaar Card Free Update) अंतिम तारीख अनेकदा वाढवण्यात आली आहे. सर्वात आधी ती 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. नंतर ही अंतिम तारीख पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आज त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. आता आधार कार्ड वापरकर्ते 14 डिसेंबरपर्यंत मोफत मध्ये आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतात. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर मात्र ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.
असे करा आधारकार्ड अपडेट- Aadhaar Card Free Update
सर्वात आधी uidai.gov.in/en च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे तुम्हाला ‘अपडेट आधार’चा पर्याय मिळेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला येथे 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
हा ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
आता तुम्हाला खाली यावे लागेल
तुम्हाला तुमच्या ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपडेट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.
यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार अपडेट झाले आहे की नाही हे तपासू शकाल.