Aadhaar Card मधील चुकीची माहिती अशा प्रकारे घरबसल्या करा अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Aadhaar Card हे खूपच महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता याशिवाय अनेक सरकारी कामांचा लाभही मिळू शकणार नाही. UIDAI कडून देशभरातील नागरिकांसाठी आधार कार्ड जारी केले जातात. आपल्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, बायोमेट्रिक डेटा, फोटो, पत्ता इत्यादी सर्व माहिती असते. मात्र जर आपल्या आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर त्यामुळे अनेक कामांमध्ये अडथळे येऊ शकतील. मात्र UIDAI ने आता अपडेट करण्याची सुविधा देखील दिली आहे. चला तर मग ते घरबसल्या कसे दुरुस्त करता येईल याविषयीची माहिती जाणून घेउयात…

What Is Blue Aadhaar Card? How Can One Avail These Identity Cards | All You  Need To Know

अनेक लोकांच्या Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर किंवा पत्त्यासहीत अनेक चुका असतात. याशिवाय कधी कधी नावामध्ये किंवा आडनावातही बदल होतो. आधार कार्डमध्ये 12 अंकी ओळख क्रमांक असतो ज्याला आधार क्रमांक असे म्हंटले जाते. प्रत्येक व्यक्तीसाठी ते वेगळेवेगळे असतात.

Aadhaar Card Update: Change address in Aadhaar in few simple steps, here's  how | Personal Finance News | Zee News

अशा प्रकारे ऑनलाइन बदला

जर आपल्या मोबाईल नंबरमध्ये काही चुका असतील तर ते घरबसल्या ऑनलाईन बदलता येईल. त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर देखील अपडेट करता येईल. कारण UIDAI ने घरबसल्या आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच आपल्या आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारख तपशील अपडेट करण्यासाठी, Aadhaar Card वर मोबाइल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. जेणेकरून अपडेट दरम्यान त्याच नंबरवर OTP पाठवता येईल.

How to Apply for a New Aadhaar Card Online and Offline

अशा प्रकारे Aadhaar Card अपडेट करा

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in ला भेट द्या.
यानंतर मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा.
यानंतर कॅप्चा भरा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
आता फोन नंबरवर पाठवलेला OTP टाका. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
यानंतर, खाली स्क्रोल करा आणि जिथे ऑनलाइन आधार सर्व्हिस असे दिसेल.
येथे दिलेल्या लिस्टमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी दिसतील.
आता जी माहिती अपडेट करायची आहे ती निवडा.
काय अपडेट करायचे आहे हा पर्याय निवडा.
नंतर एक नवीन पेज उघडेल आणि जिथे कॅप्चा एंटर करा.
मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
त्यानंतर Save आणि Proceed वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा