Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving Tips : आता लवकरच आर्थिक वर्ष संपणार आहे. ज्यामुळे लोकांकडून कर बचतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येकाला जास्तीत जास्त कर वाचवायचा असतो. अशा परिस्थितीत, अनेक लोकांकडून अशा कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते जी त्यांच्यासाठी योग्य नसते. कारण एखाद्या वस्तूवर फक्त चांगली सवलत मिळतेय म्हणून विकत घेणे हे प्रत्यक्षात कधीच फायद्याचे ठरत नाही. अशा परिस्थितीत फक्त कर वाचवणे हे पुरेसे नाही हे समजून घ्यायला हवे. तसेच फक्त कर वाचवायचा म्हणून कसलाही विचार न करता कुठेही गुंतवणूक करू नये.

Twin Conditions In Section 10B (8) Income Tax Act Has To Be Fulfilled To  Claim Exemption Relief: Supreme Court

अशा प्रकारे होते चूक

दरवर्षी जानेवारीमध्ये लोकांकडून करबचतीसाठी घाई केली जाते. अनेक लोकांकडे कलम 80C, 80D, 80E, 24B अंतर्गत कर बचतीसाठी गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती असते, मात्र तरीही ते योग्यपणे कर बचत करण्यात अपयशी ठरतात. यासाठी सर्वात आधी आपली आर्थिक उद्दिष्टे नीट समजून घ्यायला हवीत. यानंतर ती लक्षात घेऊनच गुंतवणुकीचे योग्य नियोजन केले जावे. जेणेकरून आपले ध्येय साध्य होईल आणि सोबतच करबचतही होईल. Tax Saving Tips

Income tax returns made mandatory to get 40 types of services

कोणता पर्याय निवडता येईल ???

करबचतीसाठी गुंतवणुकीचा पर्याय निवडण्याआधी आपल्याला त्याची खरोखर गरज आहे की नाही हे तपासायला हवे. कलम 80C अंतर्गत, EPF योगदान, मुलांची फी, होम लोन पेमेंट, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम इत्यादींवर कर कपातीची सुविधा मिळते. याशिवाय, इन्शुरन्स कव्हरवर देखील कर कपातीचा लाभ मिळतो. जर कलम 80C अंतर्गत कर बचतीचा पर्याय पुरेसा नसेल, तर उर्वरित पर्यायांचा विचार करता येईल. Tax Saving Tips

ITR Filing | Missed filing your tax returns? You can still file them

अशा प्रकारे ठरवा आर्थिक ध्येय

हे जाणून घ्या कि, येत्या काळातील आपल्या आर्थिक गरजा लक्षात घेऊनच आपले आर्थिक ध्येय निश्चित करायला हवे. जसे कि, मुलांचे शिक्षण, लग्न, होम लोन इ. तसेच, रिटायरमेंट नंतरच्या प्लॅनिंगचा विचार करता, जर रिटायरमेंट कॉर्पसमध्ये पीएफ योगदान कमी असेल तर ते वाढवता येईल. याद्वारे कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळेल. याशिवाय एनपीएसमध्ये दरवर्षी 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवरही अतिरिक्त टॅक्स बेनिफिट मिळू शकेल. याद्वारे रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये मदत होऊ शकेल. यावर अतिरिक्त टॅक्स सूट देखील मिळेल. Tax Saving Tips

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता