Aadhaar Updation Centers | आपले आधार कार्ड हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा ओळखीचा पुरावा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. कारण आधार कार्ड हा आपल्या भारतातील ओळखीचा मुख्य पुरावा आहे. परंतु आपल्याला या आधार कार्डमध्ये वेळोवेळी अपडेट करावे लागतात. जर तुम्हाला देखील तुमचे आधार कार्ड अपडेट (Aadhaar Updation Centers) करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. आतापर्यंत आधार कार्ड अपडेट करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुलभ प्रक्रिया मिळणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोक आधार केंद्रावर जाऊन लांबलचक रांगा लावत होते. परंतु आता तसे करण्याची काहीही गरज नाही. यासाठी अत्यंत सोपा पर्याय सरकारने जाहीर केलेला आहे.
पोस्ट इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती शेअर केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार टपाल विभागाने सार्वजनिक सुविधा लक्षात घेऊन आधार कार्डशी संबंधित सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या आधार कार्ड अपडेट करू शकता. परंतु याचे शुल्क हे आधार केंद्रावरच द्यावे लागणार आहे.
हो भारत सरकारने पोस्ट बोर्डामार्फत पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी आणि अपडेट (Aadhaar Updation Centers) सेवा सुरू केलेली आहे. या पोस्ट ऑफिस आधार केंद्रामध्ये प्रामुख्याने दोन सेवा पुरवल्या जाणार आहेतम याचा नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे. आता या सेवा कोणत्या असणार आहेत याची माहिती आपण जाणून घेऊया.
आधार नोंदणी | Aadhaar Updation Centers
तुम्हाला जर आधारसाठी नाव नोंदणी प्रक्रिया करायची असेल, लोकांची बायोमेट्रिक माहिती इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने द्यायचे असतील, तर ते तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला मोफत करता येईल. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील तुमच्या आधार नोंदणी करू शकता.
आधार अपडेशन
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायचे असेल. जसे की, तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, बायोमेट्रिक अपडेट, बोटांचे ठसे, आयरीस यांसारख्या गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्ही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टी अपडेट करू शकता.