Tuesday, January 31, 2023

अन..अलका कुबल उदयनराजेंच्या दरबारी; ‘हे’ होतं कारणं..

- Advertisement -

सातारा । साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका अर्ध्यातूनच सोडल्याचं समोर आलं. त्यानंतर अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक चकमक उडालीय. या वादासोबतच आता मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनं अलका कुबल यांना दिलं. त्याचबरोबर प्राजक्ता गायकडवाड हिच्याशीही फोनवरून चर्चा करत वाद मिटवण्याचं सूचना केली. या भेटीची माहिती उदयनराजे यांनी ट्विट करून दिली.

- Advertisement -

‘जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आज भेट घेतली. काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली,’ असं उदयनराजे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in