दिल्ली विधानसभेसाठी आपच्या ७० उमेदवारांची यादी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र ।  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापेक्ष्या कमी अवधी शिल्लक राहिला असताना आम आदमी पक्षाने आपल्या सर्व ७० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मंगळवारी ही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पातपारगंज विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवतील. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला मतमोजणीद्वारे निकाल हाती लागतील. शिक्षण, आरोग्य आणि सरकारी सेवा या मुद्य्यांवर आप सरकार ही निवडणूक लढवत आहे.

लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले दिलीप पांडे, आतिशी आणि राघव चढ्ढा हेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पांडे यांना तिमारपूरमधून, आतिशी यांना कालकाजीमधून तर चढ्ढा यांना राजेंद्रनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

पक्षाच्या समितीने ७० उमेदवारांच्या नावाला मान्यता दिली असल्याचं सिसोदिया म्हणाले. या उमेदवारांमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत सहा महिला उमेदवार होत्या. नावांची घोषणा झाल्यानंतर केजरीवाल यांनी सर्वाना शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. गेल्या वेळी आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या.

 

Leave a Comment