हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व जागा लढवणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. केजरीवाल आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे गुजरात मध्ये भाजप आणि काँग्रेसला आपचे कडवे आव्हान मिळणार आहे
भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गुजरातमध्ये आपआपलं दुकान चालवत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला मदत हवी तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना मालाचा पुरवठा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये 27 वर्षांपासूनचा दोस्ताना आहे. ही दोस्तीच ते निभावत आहेत. त्यामुळे जनतेचं मात्र शोषण होत आहे, असं केजरीवाल म्हणाले.
Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/3GXvtPVfMt
— ANI (@ANI) June 14, 2021
गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग इथं का नाही? तशाप्रकारे इथल्या रूग्णालयांची परिस्थिती देखील मागील ७० वर्षांपासून सुधारलेली नाही. मात्र आता परिस्थिती बदलेल. असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.