अवघ्या ५ मिनिटात येणार करोना टेस्टचा रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगात पसरत आहे. करोनाचा संसर्गाला रोखायचा असेल तर वेळीच लोकांची टेस्ट करणं गरजेचं आहे. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट यायला बराच वेळ लागत असल्यानं मोठ्या प्रमाणावर लोकांची टेस्ट करणं कठीण होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने अत्यंत कमी कालावधीत कोरोना चाचणी करणारी टेस्ट किट विकसित केली आहे. अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने विकसित केलेल्या किटला अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग्स असोसिएशन ऑफ अमेरिका (एफडीए) ने मान्यता दिली आहे.

या किटच्या मदतीने करोनाची पॉझिटिव्ह चाचणी अवघ्या ५ मिनिटांत समजणार आहे. तर, निगेटिव्ह चाचणीला १३ मिनिटांचा अवधी लागणार आहे असा दावा अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने केला आहे. ही किट अत्यंत लहान असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अतिशय सोपं आहे. प्रायोगित तत्वावर याची चाचणी घेण्यात आली आहे.

करोना विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या करोना चाचणी करुन या साखळीला तोडणे फार आवश्यक आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना चाचणी किटचा रिझल्ट यायला ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्याला विलंब लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने विकसित केलेली करोना चाचणी किट या संकटात क्रांतीकारी ठरणार आहे असं कंपनीचे अध्यक्ष रॉबर्ट फोर्ड यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment