Abha Card | आपले सरकार हे देशातील विविध नागरिकांना नेहमीच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात. देशातील नागरिकांना मोफत उपचार मिळावे. यासाठी देखील सरकार आणि प्रयत्न करत असतात. यासाठी सरकारने 2018 साली प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात, त्यांना सरकारकडून आयुष्यमान भारत कार्ड दिले जाते. या कार्डमध्ये काही खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांची नावे असतात. या कार्डवर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये तुम्हाला वैद्यकीय उपचार घेता येतात. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड दाखवून त्या ठिकाणी मोफत उपचार घेऊ शकता.
आयुष्मान कार्डसोबत भारत सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत आरोग्य खातेदार देखील लिहिलेले आहेत ज्याला आभा कार्ड असे म्हणतात. आभा कार्ड (Abha Card) देखील तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत सुविधा देते क? तसेच आभा कार्ड बनवण्याचे काय फायदे होतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आभा कार्डद्वारे मोफत उपचार मिळू शकतात का? | Abha Card
भारत सरकारने आता आभा चालू केलेली आहे. या कार्डचे पूर्ण नाव आयुष्मान भारत आरोग्य खाते आहे. तुमच्या आरोग्य खाते तयार करण्यासाठी या कार्डचा वापर होतो .परंतु या कार्ड मार्फत तुम्हाला मोफत उपचार घेऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला फक्त आयुष्यमान कार्ड लागेल.
या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जर तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घ्यायचे असेल, तर सरकारने त्यासाठी काही नियम आणि पात्रता आणि निकष दिलेले आहेत. या पात्रता निकष जर तुम्ही पूर्ण करू शकले, तरच तुम्हाला मोफत वैद्यकीय उपचार घेता येतात. परंतु आभा कार्डबद्दल कोणतीही पात्रता नाही. भारतातील कोणीही त्यांना हवे तेव्हा हे कार्ड बनवू शकतो.
आभा कार्डचे काय फायदे आहेत? | Abha Card
आबा काढणे आयुष्मान भारत आरोग्य कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. या कार्डवर तुमच्या आरोग्य संबंधित सगळी माहिती असते. म्हणजेच ही तुमच्यासाठी एक प्रकारे डिजिटल बैठकीचे फाईल आहे. ज्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत कोणते आजार झालेले आहेत? यासाठी तुम्ही कोणत्या ठिकाणी उपचार घेतलेले आहेत? तसेच कोणत्या रोगांचे निदान झालेले आहे? तुम्हाला कोणती एलर्जी आहे? तुमचा रक्तगट कोणता आहे? तसेच तुम्ही सध्या कोणती औषधे वापरत आहात? याची सर्व माहिती तुम्हाला हा कार्डवर मिळेल. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही रुग्णालयात गेला. आणि तुम्ही तुमचा आभा कार्ड दिले तर तुमची सगळी वैद्यकीय माहिती समोरच्या डॉक्टरला मिळेल.