सलमान खान अजून अंड्यात, त्याला दाखवून देईन की मी कोण आहे; बिचुकलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्टाईल आणि रोखठोक विधानाने सतत प्रकाश झोतात असलेले अभिजित बिचुकले यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेता सलमान खान वर संताप व्यक्त केला आहे. सलमान खान अजून अंड्यात आहे, त्याने कोणाशी पंगा घेतला हे त्याला माहित नाही असा इशारा त्यांनी दिला.

सलमान खान अजून अंड्यात आहे, अजून अंड्याबाहेर यायचं आहे. त्याला कळेल अभिजीत बिचुकले कोण आहे ते आणि कोणाशी पंगा घेतोय. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातील गादीचा वैचारिक वारस आहे. शाहू, फुले, आंबेडकांना मानणारा मी आहे. असे १०० सलमान मी गल्ली झाडायला दारात उभं करेन,” असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे. सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’, असंही ते म्हणालेत. एकदा बिग बॉस चा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी बिग बॉस च्या घरात काय चालतं याचा खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले.