सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी अटक केली आहे. आता बिग बॉसच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे. याच ओळखीवर त्यांना बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळाली होती. मात्र आता अचानक त्यांना घरातून बाहेर जावं लागत आहे.
अभिजीत बिचुकले आणि वाद
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये महिलांवर आक्षेपार्ह शेरबाजी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली.
मराठीतील एका शोमध्ये अभिजीत बिचुकलेने प्रतिस्पर्धी रुपाली भोसलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. बिचुकलेवर कारवाई करण्याची रितू तावडेंनी मागणी केली होती. बिचुकलेला घराबाहेर काढा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अशी मागणी त्यांनी केली.