उद्धवदादा, जर काही विकायचंच असेल तर…; वाईन विक्री वरून अभिजित बिचुकलेंचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपासून ते बॉलीवूड अभिनेता सलमान खान वर जोरदार टीका करत आहेत. त्याच दरम्यान त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्री च्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजब सल्ला दिला आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, उद्धवदादा तरूणपिढीला व्यसनाधीन करू नका. तुम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये आणि मॉल्समध्ये जर वाइन विकणार असाल तर याच मी कधीही समर्थन करणार नाही. जर तुम्हाला सगळीकडे काही विकायचं असेल तर अभिजीत बिचुकले अॅण्ड सन्स स्वीट्सचे सातारी कंदी पेढे आहेत ते द्या, कारण ते दुधाचे आहेत आणि त्या दुधातून माणसांना ताकद मिळेल आणि येणारी पिढी सुद्रुढ होईल.

दरम्यान, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सलमान खान वर आगपाखड केली. सलमान खान हा काही भाई नाही. त्याची भाई म्हणवून घ्यायची लायकी नाही असे म्हणत त्यांनी सलमान खानवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने सलमान खान वर कडक शब्दांत टीका करत आहेत.

Leave a Comment