अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदासाठी इच्छुक; देशभरातील खासदारांशी बोलणी सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नगरपालिका निवडणूकी पासून ते खासदारकी पर्यंत अनेक निवडणूका लढवलेले बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सध्या चर्चेत असलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. त्यादृष्टीने देशभरातील खासदारांशी आपली बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने माझे डावपेच सुरू आहे. आपल्या न्यायपालिका असतील, केंद्रातील निर्णय असतील, या सगळ्या यंत्रणा राष्ट्रपतीपदाच्या दबावाखाली असतात. म्हणून राष्ट्रपती सक्षम असला पाहिजे.  राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टी देशासाठी करायच्या आहेत. पण ते करत नाहीत, म्हणून माझी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलणी सुरू आहे. जर अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, मी बहुजन समाजातील आजे. मी निर्व्यसनी, प्रामाणिक आणि सुशिक्षित आहोत. मला कायद्याचीही चांगली माहिती आहे. मला अनुमोदन मिळावे यासाठी मी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी बोलत आहे. आमदार खासदारांनी जर सह्या दिल्या तर सगळे जमून येईल,” असेही बिचुकले यांनी म्हटले आहे.

Leave a Comment