कौतुकास्पद ! भारतीय वंशाचा अभिमन्यू ठरला जगातील सर्वात युवा ‘ग्रँडमास्टर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – आतापर्यंत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टरचा विक्रम रशियाच्या सर्गेई कर्जाकिन याच्या नावावर होता. पण आता भारताच्या अभिमन्यू मिश्राने हा विक्रम मोडला आहे. अभिमन्यू मिश्रा या भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलाने हा पराक्रम केला आहे. १२ वर्ष, चार महिने आणि २५ दिवस वय असणाऱ्या अभिमन्यूने भारताच्या जीएम लियोनला पराभूत करून जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

याअगोदर नोव्हेंबर २०१९ मध्ये अभिमन्यू १० वर्ष ९ महिने आणि ३ दिवस वय असताना जगातील सर्वात युवा आंतरराष्ट्रीय मास्टर बनला होता. त्यावेळी त्याने भारताच्याच आर प्रग्गानंधाचा विक्रम मोडला होता. आर प्रग्गानंधा याने ३० मे २०१६ रोजी हा विक्रम आपल्या नावावर केला होता. ‘लिऑनविरुद्धचा सामना कठीण होता, पण त्याची एक चूक माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करून गेली. या यशामुळे मी आनंदी आणि समाधानी आहे.’ असे अभिमन्यू मिश्रा म्हणाला.

यादरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अभिमन्यूने ओवर-द-बोर्ड कोणताही सामना खेळला नव्हता. यानंतर त्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अभिमन्यूने काही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. यावर्षी मार्चमध्ये ईएलओ रेटिंग २४०० पार केले. भिमन्यूचे वडील हेमंत न्यू जर्सीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. कर्जाकिनचा विक्रम मोडण्यासाठी त्यांनी मोठा साहसी निर्णय घेत युरोपमधील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला.”युरोपमधील स्पर्धा आमच्यासाठी मोठी संधी होती, हे आम्ही जाणून होतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही बुडापेस्टला पोचलो. माझे आणि माझी पत्नी स्वातीचे एक स्वप्न होते. ते अभिमन्यूने पूर्ण केले. या भावना व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत,” अशी प्रतिक्रिया अभिमन्यूचे वडील हेमंत यांनी दिली आहे.

Leave a Comment