माझ्या ईमेल अकॉउंटमध्ये घुसखोरी करण्यात आली होती – अभिनव कश्यप 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड दिगदर्शक तसेच अभिनेता अनुराग कश्यप सध्या एका ट्विटर पोस्टमुळे चर्चेत आला आहे. तर त्याचा भाऊ अभिनव कश्यप हा त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आला होता. अभिनव कश्यप याने त्याच्या सोशल मीडियावरून  सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून त्याचे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट केली होती. या पोस्टचे स्पष्टीकरण देत त्याने आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्याने माझ्या ईमेल मध्ये घुसखोरी करून कुणीतरी हा प्रकार केल्याचे सांगितले आहे.

अभिनव ने त्याच्या फेसबुक अकॉउंटवरून, “कुणीतरी माझ्या ईमेल अकॉउंटला लॉग इन करायचा प्रयत्न केला होता, आता हे खूप मनोरंजक होते आहे. खान इतका खडखडाट का करत आहेत? ते काय लपवत आहेत? माझे तोंड बंद करण्यासाठी ते इतके का उत्सुक आहेत?” असे लिहिले आहे.  आधीच्या पोस्टमध्ये अभिनवने, ‘अरबाज खान, सोहेल खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या करिअरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे ‘दबंग २’ सारखा चित्रपट माझ्या हातून गेला. अरबाज खानने माझ्याकडून हा प्रोजेक्ट हिसकावून घेतला. मला माझी साइनिंग रक्कम परत करावी लागली होती. माझ्याशी करार करणाऱ्या निर्मात्यांना धमक्या दिल्या गेल्या. माझ्या कुटुंबीयांतील महिलांवर बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या,’ असे गंभीर आरोप केले होते.

त्यावर अरबाज खानने प्रतिक्रिया देत यावर लिगली कारवाई करत आहोत असे म्हटले आहे. तर सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी अभिनवला जे करायचं आहे ते करु द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही असे एका मुलाखतीमध्ये म्हटले. बॉलिवूड हे असे क्षेत्र आहे जिथे कोणत्या वेळी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. असे आरोप प्रत्यारोप तर नेहमीच केले जात असतात.

Leave a Comment