औरंगाबाद | भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अजिंठा लेणी पाहण्यासाठी प्रवेश शुल्क सोबत लागणारे असली तर विद्युत शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अजिंठा लेणी दर्शनासाठी फक्त चाळीस रुपये शुल्क आकारला जाणार आहे. आतापर्यंत अजिंठा लेणी च्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांकडून चाळीस रुपये तिकीट आणि विद्युत शुल्क पाच रुपये असे पाणी चाळीस रुपये आकारण्यात येत होते.
आता हे विद्युत शुल्क रद्द करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. यामुळे पर्यटकांना अजिंठा लेणी येथील चित्रशैली व शिल्पकलेचा आनंद लुटता येईल. पर्यटनासाठी आलेले पर्यटक लेणीचे शुल्क बघून वैतागून माघारी परतत होते. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस तिकीट खिडकीवर असलेल्या व्यक्तीसोबत बाचाबाची होत असल्याचे दिसून येत होते. आता काही प्रमाणात पर्यटकांनादिलासा मिळाला आहे.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फर्दापुर येथील टी पॉईंट वर सुविधा शुल्क परत व्यक्ती दहा रुपये, बस भाडे विनावातानूकुलित बस साठी एकेरी फेरीसाठी वीस रुपये, वातानुकूलित बससाठी 30 रुपये एवढे शुल्क एसटी महामंडळाकडून आकारले जाते. आणि अजिंठा लेणी भारतीय पुरातत्व विभागाकडून 45 रुपये तिकीट आकारण्यात येत होते. आता 40 रुपये तिकीट आकारला जाणार आहे.