हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नव्हे, सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही तर सर्वधर्म समभाव असा आहे. हे हिंदू संस्कृतीचं नैसर्गिक स्वरुप आहे. आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान केला आहे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे विविधतेत एकता आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह पुढे जायचं आहे. असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. दिल्लीत आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले, ”आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही. जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीनं बोलत आहे.” आपली हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.