पुणे | समिर रानडे
गणपती उत्सवा दरम्यान एबीपी माझा तर्फे महा मोदक हा एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ६ फुट उंचीचा तसेच सुमारे ३०० किलो वजनाच्या या मोदकाचे पुण्यात आगमन झाले. हा महामोदक प्रथम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात अर्पण करण्यात आला होता आणि नंतर पुण्याच्या १० मंडळांना अर्पण करण्यात आला.
महिंद्रा सुप्रो एचडी सीरीज प्रॉफिट्रक यांनी सादर केलेला एबीपी माझा महामोदक या उपक्रमात मुंबई ते पुणे व परत असा ४०० किमीचा प्रवास केला. अभिनेता पुष्कर जोग यांनी काही मंडळाला भेट दिली आणि तिथे आरती केली.
या उपक्रमाने भेट दिलेल्या १० मंडळांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, कसबा गणपती, तुळशीबाग, अखिल मंडई मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणशोत्सव मंडळ, जिलब्या मारूती मित्र मंडळ, नातूबाग मित्र मंडळ, चिमण्या गणपती मित्र मंडळ, टिळक रोड सार्वजनिक मित्र मंडळ आणि राजाराम मित्र मंडळ यांचा समावेश आहे.